पुणे, १० ऑगस्ट २०२०: छत्रपती संभाजी महाराजांचे सेवक रामशेज किल्ल्याचे किल्लेदार “गोविंद गोपाळ गायकवाड” यांची ३६१ वी जयंती १० ऑगस्ट २०२० रोजी वढू बुद्रुक तालुका शिरूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाविषाणूच्या प्रादुर्भावामुळे मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच फिजिकल डिस्टंसिंग द्वारे छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीला विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर गोविंद गोपाळ गायकवाड यांनी औरंगजेबाच्या आदेशाला न जुमानता छ. संभाजी महाराजांचा सन्मापूर्वक अंत्यविधी केला होता. गोविंद गोपाळ गायकवाड यांच्यावरील पुस्तकाचे १९६७ प्रकाशन झाले होते . महाराष्ट्राचे थोर समाजसुधारक व विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांनी सिद्धप्पा मोरे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन केले होते.
या प्रसंगी नाना जाधव (जांभळी) गोविंद गोपाळ गायकवाड यांचे तेरावे वंशज राजेंद्र गायकवाड पांडुरंग गायकवाड, किरण शिंदे, सर्जेराव वाघमारे, अशोक नगरे, रमेश गायकवाड, विवेककुमार तायडे आदी मान्यवर उपस्थित होते. “नव्या पिढीला छ. संभाजी महाराज व गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या शौर्याची प्रेरणा देणारा इतिहास माहिती व्हावा, तसेच गोविंद गोपाळ यांच्या शौर्याचा इतिहास पाठ्य पुस्तकात अभ्यासाला यावा, असे यावेळी राजेंद्र गायकवाड म्हणाले. यावेळी पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, त्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे