केंद्रीय बोर्ड दहावी निकालाची तारिख जाहीर

नवी दिल्ली, दि. १४ जुलै २०२०: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) १३ जुलै रोजी बारावीचा निकाल जाहीर केला. मंगळवारी दहावी निकालाची तारिखही जाहिर करण्यात आली. सीबीएसई बोर्डाने स्पष्ट केले होते की १० वीचा निकाल आज म्हणजे १४ जुलै रोजी येणार नाही . आज मंगळवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटद्वारे दहावीच्या निकाल विषयी ही माहिती जाहीर केली.

आपल्या ट्विटर अकाऊंटवर ते म्हणाले की दहावीचा निकाल आज येणार नसून तो उद्या म्हणजेच १५ जुलै रोजी जाहीर करण्यात येईल. दहावीचा निकाला विषयी स्पष्टता देताना त्यांनी विद्यार्थ्यांना निकालासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

निकाल कोठे बघाल?

केंद्रीय बोर्डाचा दहावीचा निकाल cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाईटवर तपासता येईल. याव्यतिरिक्त विद्यार्थी आपला दहावीचा निकाल सीबीएससीच्या ॲप द्वारे देखील तपासू शकता. नुकताच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बारावीचा निकाल जाहिर केला आहे. सीबीएसई बारावीचा निकाल विद्यार्थ्यांनी cbseresults.nic.in या या वेबसाईटवर तपासावा. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश पत्र त्यांच्याकडे ठेवलेच पाहिजे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा