गोल पोस्ट कृषी कृषी विश्व ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांसाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद

ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांसाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद

Central Government Agricultural Mechanization Fund
केंद्र सरकारने कृषी यांत्रिकीकरणासाठी निधींची तरतूद केली.

केंद्र सरकारने कृषी यांत्रिकीकरणासाठी निधींची तरतूद केली.


Central Government Agricultural Mechanization Fund:राज्यातील अनुसूचित जाती, जमाती, सर्वसाधारण महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे, यासाठी राज्य सरकारने या आर्थिक वर्षात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेद्वारे प्रामुख्याने अनुसूचित जाती, जमाती, सर्वसाधारण महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या किंमतीच्या ५० टक्के किंवा १.२५ लाख यापेक्षा कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांना किंमतीच्या ४० टक्के किंवा एक लाख यापैकी कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेची जास्तीत जास्त माहिती महाडीबीटी संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून याद्वारे मिळणारे अनुदानही महाडीबीटीद्वारेच मिळणार आहे. थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हि रक्कम जमा होईल. या निधीद्वारे लाभार्थी कृषी औजारे, यंत्रे, ट्रॅक्टर खरेदी करू शकतात .

याआधी केंद्र सरकारने या कृषी यांत्रिकीकरणासाठी निधींची तरतूद केली आहे. परंतु त्याचा लक्ष्यांक राज्य सरकारच्या अनुषंगाने कमी आहे आणि त्यामुळे राज्य सरकारने पुढाकार घेऊन राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजना सुरु केलेली आहे यामुळेच २०२५- २६ या आर्थिक वर्षासाठी हि योजना राबविण्यासाठी शासन निर्णयांच्या द्वारे राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे . यासाठी ४०० कोटी इतक्या रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे . तर यामध्ये जे शेतकरी लाभ घेऊ शकतात त्यांना १२ सप्टेंबर २०१८ नुसार जो काही शासन निर्णय राज्य सरकारने प्रसिद्ध केलेला होता त्यानुसार लाभार्थ्यांच्या पात्र अपात्रतेच्यानिकष अटी ठरविण्यात आल्या आहेत .

न्यूज अनकट प्रतिनिधी – तनया रेडकर

error: Content is protected !!
Exit mobile version