भुसावळ २० फेब्रुवारी २०२४ : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने अकोला मार्गे धावणाऱ्या मुंबई-नागपूर द्विसाप्ताहिक विशेष आणि पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष गाड्यांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात या दोन्ही रेल्वे गाड्यांच्या अप व डाऊन मार्गावर एकूण ९० फेऱ्या होणार असल्याने मलकापूर, नांदुरा, शेगावसह बुलढाणा जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,मुंबई-नागपूर द्विसाप्ताहिक विशेष आणि पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष गाड्यांच्या ३० फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. या गाड्यांची वेळ, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नसल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
न्युज अनकट प्रतिनीधी : शिवाजी मामनकार