पेणच्या गणेशमुर्तींना केंद्र शासनाचे जी आय मानांकन जाहीर

15

पेण, रायगड १२ डिसेंबर २०२३ : सुबक मूर्तीकाम आणि जिवंत डोळ्यांची आखणी यासाठी जगप्रसिध्द असणाऱ्या पेणच्या गणेशमुर्तींना केंद्र शासनाने जी आय मानांकन जाहीर केले आहे. गणेश मूर्तींना मिळालेले हे जी आय मानांकन म्हणजे पेणच्या मूर्तिकारांसाठी मानाची आणि ऐतिहासिक घटना असल्याचे मत गणेश मूर्तीकार व व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांनी मांडले.

पेणच्या गणेशमूर्तीना मिळालेले हे नामांकन मूर्तिकारांना चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म मिळऊन देईल. यापूर्वी पेणच्या गणेशमूर्तींच्या नावाने राज्यातील इतर मूर्तिकार दुसऱ्या गणेशमूर्ती विकत असत. माञ आता केन्द्र शासनाचा नामांकन असलेला लोगो पेणच्या मूर्तींना मिळणार असल्याने गणेशभक्तांची मूर्ती खरेदी करतानाची होणारी फसवणूक बंद होईल असे देवधर यांनी सांगितले.

रायगड जिल्हा उद्योग केंद्राचे प्रमुख जी एस हरलैय्या यांनी मार्गदर्शन करताना केंद्र शासनाने पेणच्या गणेशमूर्ती उत्पादनाला भौगोलिक नामांकन मिळाले, ही अभिमानास्पद बाब असुन याचा मूर्तीकारांनी व्यवसाय वृद्धीसाठी फायदा घ्यावा असे सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : दत्तात्रय शेडगे