पुण्याच्या प्रदूषणमुक्तीसाठी केंद्र सरकार उचलणार पाऊल, हायड्रोजन इंधन आणि इलेक्ट्रीक गाड्या धावणार

29

पुणे, २६ सप्टेंबर २०२३ : पुणे शहरात नागरिकरणा बरोबर वाहनांची संख्याही विक्रमी आहे. त्यामुळे पुण्याची ओळख सर्वाधिक वाहन असलेले शहर म्हणून होत आहे. चांगले वातावरण लाभलेल्या पुणे शहराला प्रदूषणाचा विळखा बसून ते धोकादायक पातळीवर पोहचले आहे. या आधीही पुणे शहरातील प्रदूषणावर तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली आहे. आता केंद्र सरकारने याविषयी हालचाली सुरु केल्या आहेत. पुणे शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे. पुण्याच्या प्रदूषणमुक्तीसाठी हायड्रोजन इंधन आणि इलेक्ट्रीकवर गाड्या धावणार आहेत.

वाहन उद्योग क्षेत्रात पुणे शहर देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील ५० टक्के वाहने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात निर्माण होतात. तसेच पुणे शहराचा विस्तार वाढल्यामुळे वाहनांच्या संखेत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे प्रदूषणाचा स्तरही उंचावला आहे. पुणे शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी कचर्‍यातून हायड्रोजन निर्मितीचा प्रकल्प केंद्र सरकारने सुरु केला. पुणे शहरातील हडपसर भागात हा प्रकल्प उभारला जात आहे. त्या इंधनाचा वापर पुणे शहरासाठी करण्यात येणार आहे.

हायड्रोजन निर्मिती प्रकल्प पुण्यात होत आहे. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या इंधनातून आणि विजेच्या माध्यमातून गाड्या चालवल्या जाणार आहे.हायड्रोजन इंधन आणि इलेक्ट्रीसिटी अशी दुहेरी पद्धत वाहनांसाठी पुण्यात करण्यात येणार आहे.यानंतर पुण्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा हायड्रोजन इंधन आणि विजेवर चालवण्यात येणार आहे.या प्रकल्पासाठी केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने तयारी चालवली आहे.त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.देशातील सार्वजनिक वाहतूक सेवेवरील पहिला प्रकल्प पुणे शहरात उभा राहणार आहे.

पुणे शहरातील वाढत्या प्रदूषणावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक वेळा चिंता व्यक्त केली होती. पुणे प्रदूषणमुक्त करण्यासाठी काय उपाय योजना करता येतील, त्यावर अभ्यास सुरू करण्याचे काम त्यांच्या माध्यमातून केले जात आहे. कचर्‍यापासून इंधन निर्मितीचा प्रकल्प पुणे शहरात सुरु झाल्यानंतर आता सार्वजिनक वाहतुकीवर लक्ष केंद्रीत केले गेले आहे. यामुळे पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था चांगली होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा