गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा “निहित सोशल फाउंडेशन” च्या वतीने स्वप्निल कुंजीर यांना सन्मानपत्र

“निहित सोशल फाउंडेशन” च्या वतीने स्वप्निल कुंजीर यांना सन्मानपत्र

कुंजीरवाडी, दि. १० जून २०२०: कुंजीरवाडी येथील दि. १० जून २०२० रोजी कोरोना या राष्ट्रीय आपत्ती काळात पुर्व हवेली भागातील शेकडो लोकांना मदतीचा हात देणारे शिवसेनेचे माजी तालुका संघटक तथा वसंतराव कुंजीर पाटीलचे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष स्वप्निल कुंजीर, यांना “माहिती सेवा समिती पुणे” व “निहित सोशल फंडेशन” अशा दोन सामजिक संस्था कडून “कोरोना योद्धा” म्हणून व “भुमी रक्षक वृत्तपत्र” कडून जीवन रक्षक असे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

गेल्या दोन महिन्यांपासुन स्वप्निल कुंजीर हे प्रत्येक गरजवंत लोकांना किराणा धान्य व भाजीपाला गोर गरीब लोकांना वाटप करत आहेत. त्यांचे समाजातील सगळ्या स्थरातून कौतूक होत आहे. आज पर्यंत त्यांनी केलेल्या कामाचा गौरव करण्यात आला.

त्याचबरोबर इथून पुढे कराव्या लागणाऱ्या कामाबाबत त्यांच्यामध्ये स्फूर्ती यावी मनोधैर्य वाढावे म्हणून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. यापुढे आम्ही आणखी चांगले काम करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही स्वप्निल कुंजीर यांनी “न्यूज अनकट” शी बोलताना सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version