गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई छगन भुजबळ पुन्हा: रुग्णालयात दाखल.

छगन भुजबळ पुन्हा: रुग्णालयात दाखल.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीतील प्रचारासाठी च्या धावपळीत उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना २९ ऑक्‍टोबरला रुग्णालयात दाखल केले. मुंबईत झालेल्या पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीसाठी ते डॉक्टरांची परवानगी घेऊन उपस्थित राहिले बैठकीनंतर ते पुन्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून आणखी दोन दिवस त्यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागतील असे त्यांच्या निकट वर्तियांनी सांगितले.

error: Content is protected !!
Exit mobile version