चक्रीवादळानंतर देखील मुंबईत पावसाचा जोर कायम

10

मुंबई चक्रीवादळ निसर्ग आल्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. काल दुपारी हे चक्रीवादळ मुंबईकडे न जाता अलिबागला जाऊन धडकले त्यानंतर ते पुणे आणि तिथून नाशिकच्या बाजूने पुढे सरकत गेले. मात्र हे चक्रीवादळ गेल्यानंतर मुंबई आणि पुणे दोन्ही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली . बुधवार पासूनच मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती त्यानंतर आजपर्यंत सातत्याने पाऊस पडत आहे. पुण्यामध्ये देखील आज सकाळी दहा वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे.

मुंबईमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे उन्मळून पडली आहेत. सखळ भागांमधील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे लोकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. पहिल्याच पावसाळ्यात मुंबईची अशी हालत झाली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात येत्या २४ तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशच्या भोपाळमध्येही पावसाचा जोर कायम आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मध्य प्रदेशात ७ जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहू शकते. ६ जूनपर्यंत येथील कमाल तापमान ३२ अंश आणि किमान तापमान २५ अंश राहील असा अंदाज वर्तविला जात आहे.

महाराष्ट्राव्यतिरिक्त या राज्यातही पावसाचा इशारा

याच बरोबर येत्या २४ तासांत मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या व्यतिरिक्त पुढील २ ते ३ दिवस राजस्थान, हरियाणा, पंजाबमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवारी महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यात मुसळधार पाऊस झाला. त्याचवेळी राजस्थान, उत्तर प्रदेशासह बर्‍याच मैदानी राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली आहे . दरम्यान, बुधवारी शिमला येथे हिमवृष्टी झाल्याचे दिसून आले आगे. येथे पुढील २ ते ३ दिवस हवामान असेच राहील. याखेरीज हिमाचल आणि उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईसह महाराष्ट्राच्या बर्‍याच भागात पाऊस सुरू झाला आहे. राज्यात बर्‍याच जिल्ह्यात पाऊस पडत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांत आज गुरुवारी संध्याकाळपर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येथे जास्तीत जास्त तापमान ३६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२ डिग्री राहील.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा