गोल पोस्ट गुन्हा चाकूचा धाक दाखवत तरुणाची तरुणीला धमकी

चाकूचा धाक दाखवत तरुणाची तरुणीला धमकी

पुणे : ‘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मित्राबरोबर फिरताना दिसलीस तर खल्लास करेन’ अशी धमकी एका तरुणाने भर रस्त्यात चाकूचा धाक दाखवत तरुणीला दिली. हा प्रकार सारसबागेशेजारी असणाऱ्या पाटील प्लाझा समोर घडला. याप्रकरणी संबंधित तरुणाला अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
सचिन माने असे या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी 19 वर्षाच्या तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धमकी देणारा तरुण आणि संबंधित तरुणी एकाच परिसरात राहतात. ही घटना घडली त्या दिवशी आरोपी तरुणाने संबंधित तरुणीसमोर गाडी आडवी घालत चाकूचा धाक दाखवला. ‘ तू मला खूप आवडतेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू फक्त माझी आहेस. तू तुझ्या मित्रापासून दूर राहा नाहीतर दोघांनाही खल्लास करेन अशी धमकी दिली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबके तपास करीत आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version