महाराष्ट्रातील संस्कृती, आध्यात्मिकता जोपासणारी ऐतिहासिक नगरी चंपावती ( बीड )

महाराष्ट्रातील संस्कृती आणि आध्यात्मिकता जोपासणारी ऐतिहासिक नगरी म्हणून त्याकाळी प्रसिद्ध असलेली चंपावती. यालाच आता बीड असे संबोधले जाते. साधारणत: या जिल्ह्याची संख्या २.५८५.०४९ एवढी आहे. बॉलिवूड असो किंवा संस्कृतीची विविधता असो महाराष्ट्रात सगळीकडेच प्रसिद्ध आहे पण महाराष्ट्रातील असे एक पर्यटनाचे ठिकाण आहे त्याला जगात तोड नाही ते म्हणजे बीड.

आपण बीड शहरामध्ये आल्यानंतर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दिसतो भव्यदिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बीड शहराच्या बाहेरच्या साईडला गेल्यानंतर आपल्याला बिंदुसरा ही नदी दिसते बिंदुसरा नदी ही बीड शहरांमधून वाहते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणाहून कंकालेश्वर म्हणजे 1.8 किलोमीटर इतके आहे.

एक हजार फूट उंचावरून दिसणारे हे कंकालेश्वर मंदिर जणू हे मंदिर ऐकाच दगडावर उभ आहे असे जाणवते. ही तर निसर्गाचीच देणगी म्हणावी लागेल. यामध्ये असणारे जलकुंड एखाद्या नदी सारखीच दिसते. मंदिरावरील असणारे शिल्प उंचावरून पाहिल्यानंतर मन तृप्त होते. शिल्पकलेच्या तीन दिला वैशिष्ट पूर्ण असणारे शिवालय मुळात दशावती मंदिर आहे.

महाराष्ट्रातील सर्वांग सुंदर जलमंदिर म्हणून आभ्यासक या मंदिराकडे पाहतात. कंकालेश्वर मंदिराच्या नामकरणाविषयी अनेक प्रवाह आहेत. कनक म्हणजे सोने , सोन्याप्रमाणे हे मंदिर चमकते म्हणून मंदिराचे नाव कंकालेश्वर पडले असावे किंवा कंकाल नावाच्या सिध्दपुरपान या मंदिरात आराधना केली म्हणून मंदिराचे नाव कंकालेश्वर पडले असेही म्हटले जाते.

स्थापत्यकलेशी या मंदिराचे कमालीचे साम्य असल्याने कंकालेश्वर मंदिर चालुक्य राजा सहावा विक्रमादित्याने १०७६ ते ११२६ च्या दरम्यान केव्हा तरी उभारले यात दुमत रहात नाही. सहावा विक्रमादित्य हा सोमेश्वर आहमल्लालाचा पुत्र होता. त्याचा मोठा भाऊ सोमेश्वर ( दुसरा ) आहमल्लालाच्या नंतर गादीवर बसला. विक्रमादित्यास दोन राण्या होत्या. पैकी लक्ष्मीदेवी ही राजकारणात निपुण होती . तर केतलादेवी ही मंदिर स्थापत्य, शिल्प व संगीतात रस असणारी होती. मंदिरावर या दोघींच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव ठळक दिसतो. विक्रमादित्य हा आपला मोठा भाऊ सोमेश्वरच्या वतीने बीडसह अन्य भागावर राज्य करत होता.

मंदिरावरील देव कोष्टकांची रचना चालुक्य होयसला कलेला अधोरेखांकित करत निलंग्याच्या निलकंठेश्वर मंदिराच्या एक पाऊल पुढे या मंदिराचे स्थापत्य सरकते. सोमनाथपूरच्या केशव मंदिराच्या कलात्मक घुमटाशी कंकालेश्वरच्या निलंगा व बलसाने येथील मंदिराशी साधर्म्यता आहे.

कंकालेश्वरचे स्तंभ फारच कलात्मक वाटतात.तळखड्यास चौकोणी तर शीर्षस्थानी ते गोलाकार आहेत . खिर्डीपूरच्या कोप्पेश्वर देवळाच्या स्तंभाशी ते या स्तंभाची मांडणी फारच चित्तवेधक व शास्त्रीय आहे.

दक्षिणेतील विविध विख्यात मंदिरातच अशी मांडणी सापडते . अंबरनाथ व अन्वा मंदिरातील स्तंभाशी ते साधर्म्यता पावतात . ते छताच्या घुमटाला आधार देतात. घुमटाकार छताची ही योजना सोमनाथ, अन्वा व अंबरनाथ मंदिराशी जुळते . मंदिराच्या बाह्य भिंतीवर कीर्तिमुख पट्ट्याचा विळखा आहे.

मंदिराचा तोरण भाग बाहेर काढून त्याना कलात्मक केले आहे. बाह्य भागावरील शिल्पे खूपच लहान असल्याने रचनाकाराने नियोजनअष्टधारा रचनेचे असो वा त्रिदल शैलीचे होयसल कलेचे अनुकरण क्षणोक्षणी जाणवते मंदिराच्या बाह्य भिंतीवरील शिल्पे मात्र होयसलाचा प्रभाव दर्शवित नाहीत. ही शिल्पे आकाराने कंकालेश्वर मंदिरातील नक्षीदार स्तंभ आहेत.

विशेषतः मंदिराच्या मागील बाजूच्या देवकोष्ठकातील नृत्य करणाऱ्या शंकराचे शिल्प अप्रतिमच म्हणावे लागेल. या शिल्पातील नृत्यस्त शंकरासोबत त्याच्या पदन्यासात व लयीत मग्न झालेला नंदी आणि वादक यांची शिल्पकाराच्या प्रखर नृत्य -जाणिवेचाच आविष्कार शिवाचे अप्रतिम शिल्प म्हणायला उभारणीत केवळ दगडांचा वापर करण्यात आला आहे. त्यात कोणत्याही अन्य बांधकाम साहित्याचा वापर केलेला नाही. मंदिराचा विशाल कुंडखोदल्यावर निघालेल्या दगडांचाच मंदिर उभारणीसाठी वापर करण्यात आला आहे.

अशीच बीड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या पर्यटनस्थळांची माहिती आपण पाहू शकता www.swarang.tv ” स्वरंग” मराठी वाहिनीवर दर शनिवारी संध्या.६ वाजता.

न्युज अनकट

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा