भारत पाकिस्तान वाद पुन्हा एकदा चर्चेत, जाणून घ्या काय आहे कारण..

21
India Vs Pakistan Champions Trophy 2025

India Vs Pakistan New dispute: चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्याचा कालावधी जसजसा जवळ येते आहे तसतस भारत आणि पाकिस्तान यांच्यात नवीन नवीन वाद होताना दिसत आहेत. मागे झालेल्या वादावर भारत चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार का नाही ? याबाबत चर्चा रंगल्या होत्या. टीम इंडिया पाकिस्तान मध्ये खेळणार नाही. अशी ठाम भूमिका भारतीय क्रिकेट बोर्डाने घेतली होती. त्याचबरोबर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कर्णधार रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उद्घाटनासाठी बोलवले होते, त्यावेळी सुद्धा बीसीआयने रोहित शर्माला जण्यासाठी परवानगी दिली नव्हती. आता भारतीय संघाचे सामन दुबईला होणार असून त्यासाठी भारतीय टीम दुबईमध्ये पोहचली आहे. यातच पाकिस्तानने भारताला डिवचले आहे. याबबात एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. चला तर मग जाणून घेऊ नेमका वाद काय आहे.

मागच्या २ दिवसापासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून तो पाकिस्तानमधील करची स्टेडियमवरचा असल्याच बातम्यांमधून सांगितले जात आहे. ज्यावरून चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नियमानुसार जे संघ ही ट्रॉफी खेळण्यासाठी पात्र असतात त्या संघाचे ध्वज स्टेडियमवर लावले जातात, परंतु पाकिस्तान मधील कराची स्टेडियमव सर्व संघाचे ध्वज एका रांगेत लावले असून, भारताचा तिरंगा इतर संघाच्या जागी लावण्यात आलेला नाही. पाकिस्तान बोर्डाने केलेल्या वृत्तीवर आता सोशल मिडीयावर त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. तुम्ही स्टेडियमवर भारताचा तिरंगा का नाही लावला असा थेट सवाल त्यांना केला जात आहे. आता याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले पाकिस्तान क्रिकट बोर्ड :

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याबबात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच कारण दिल आहे. ते म्हणाले की भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये येऊन चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी नकार दिला होता. त्यांचे म्हणणे असे आहे की जे संघ नॅशनल स्टेडियम कराची, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम आणि गडाफी स्टेडियम लाहोर या ठिकाणी जे संघ खेळण्यासाठी येणार आहेत. त्याच खेळणाऱ्या देशांचे ध्वज लावले आहेत”, असं PCB ( पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ) पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी ७ संघ पाकिस्तान मध्ये पोहोचले असून उद्या या ट्रॉफीचा पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. ही ट्रॉफी तब्बल ८ वर्षानी होत असल्याने सर्व संघ ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे उद्या पासून सुरू होणाऱ्या या ट्रॉफीच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा