नवी दिल्ली, दि. १८ मे २०२०: चक्रीवादळ अम्फान आता बंगाल आणि ओडिशा किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल करत आहे. चक्रीवादळाचा सध्याचा वेग १६० किमी / तासाचा आहे. सध्या ते दिघापासून सुमारे १००० किमी अंतरावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार १९ मे रोजी या चक्रीवादळामुळे भयंकर आपत्ती उद्भवू शकते. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार चक्रवाती वादळ ‘अम्फान’ हे एका सुपर चक्रीवादळामध्ये बदलू शकतो. अशी माहिती भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिली आहे.
बंगालच्या उपसागरावरील चक्रीवादळाची गती आणखी वाढण्याची शक्यता आहे. हा धोका लक्षात घेता ओडिशाच्या १२ आणि कोलकातासह बंगालमधील ५ जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बंगालमध्ये दक्षिण २४ परगना, उत्तर २४ परगना, पूर्व आणि पश्चिम मेदनापूर उच्च सतर्कतेवर आहेत. पुढील आदेश येईपर्यंत मासेमारी प्रक्रियेवर बंदी घालण्यात आली आहे.
दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेला दबाव चक्रीवादळाच्या रूपात बदलू लागला आहे. जे बंगालच्या उपसागराच्या उत्तर-पश्चिमेत पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशा किनारपट्टीकडे वेगाने वाढत आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) रविवारी (१७ मे) पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किना-याकरिता अलर्ट जारी केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी