चंद्रकांत पाटील यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा, भाजपला घरचा आहेर….

मुंबई, १६ डिसेंबर २०२०: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना घरातुनच आहेर मिळताना दिसतोय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप व पदआधिकार्यांकडून होत आहे.

सत्तेत असताना इतर पक्षात फोडाफोडीचे राजकारण करून चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजप पक्षात अनेकांना घेतले. पण, या सर्व घडामोडीत त्यांनी जुण्या जाणत्यांना डावलून नवीन आलेल्यांना पदे दिली. त्यामुळे काही दिवसांपासून भाजपच्या पदआधिकार्यांमधे नाराजीचे सूर उमटताना दिसत आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक गांभीर्याने घेतली नाही. ज्यामुळे भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि समरजितसिंह घाटगे यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देणयाची मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, हातकणगंलचे माजी तालुकाध्यक्ष पी.डी. पाटील यांनी केली आहे.

भाजप मधील पदाधिकऱ्यांची किंवा नेत्यांची नाराजी नवीन नाही. काही महिन्यांपूर्वी भाजप मधे गेली अनेक वर्ष निष्ठेने काम करून ही बहुजनाचे नेते एकनाथ खडसे यांनाही पक्षातील काही नेत्यांनी जाणीवपूर्वक डावलले होते. ज्याचा वाईट परिणाम भाजपला भोगावा लागला आणि नाथाबुवा यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा