चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे पिता-पुत्रांवर निशाणा

28

पुणे, २८ ऑक्टोबर २०२२ : भाजप आणि शिवसेना युतीनंतर आता दोन्ही पक्षाची तोंडे ३६ आकड्याप्रमाणे झाली आहे. दोन्ही पक्ष एकमेकांना खाली पाडण्यासाठी झटत आहे. यात भाजप कमी नाही की शिवसेना.

सध्या आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत तर उद्धव ठाकरे आता दौऱ्याच्या तयारीत आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने या दौऱ्याला जास्त महत्त्व आहे. असे त्यांचे मानणे आहे.
पण या दौऱ्यावरून आता चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे पिता-पुत्रांवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना खूप उशीरा कळलं की गांधी देश फिरले. त्यांनी बाहेर फिरुन लोकांची दु:खे समजून घेतली. लोकांच्या अडचणीत त्यांना मदत केली. पण ठाकरेंना वाटतं की, केवळ मातोश्रीमध्ये बसून लोकांची दु:ख कळतात. पण तसं[ नाही. त्यांना घरातून बाहेर पडल्यावर आता लोकांची मने कळतील. कदाचित याचा फायदा होईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

एकेकाळची युती आता शत्रुत्वात बदलली आहे. त्यामुळे निशाणेबाजी ही टळत नाही. पण त्यामुळे मन दुखावून युती नाही, द्रुती झाली असं म्हणावं लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा