गोल पोस्ट इतर राजकारण चंद्रकांत पाटलांची निवडणूक साडेसहा लाखांत

चंद्रकांत पाटलांची निवडणूक साडेसहा लाखांत

पुणे: कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतील खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाकडे दिला आहे. त्यानुसार एकूण सहा लाख ५७ हजार २८९ रुपये खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या निवडणूक प्रतिनिधींनी हा तपशील आयोगाकडे दिला आहे त्यानुसार १३ ऑक्टोबरला शिवाजी पुतळा ते आशिष गार्डन पर्यंत काढण्यात आलेली रॅली आणि जाहीर सभेवर १ लाख ८ हजार १५४ रुपये खर्च दाखवला आहे.
रॅलीसाठी हलगी, ध्वनिक्षेपक, रिक्षा, प्रचारासाठी वाहन इत्यादी खर्चांचा समावेश आहे. तसेच यामध्ये इतर खर्चाचा हिशोब देण्यात आला आहे जसे की लागणारे स्टेशनरी, एलईडी स्क्रीन, साऊंड सिस्टम, सोशल मीडिया इत्यादींसाठी चा तपशील ही या खर्चामध्ये देण्यात आला आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version