गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा चंद्रपूर येथील झी बाजारला आग

चंद्रपूर येथील झी बाजारला आग

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात बाजारपेठेत जयंत टाकीज चौकात अत्यंतवर्दळीच्या ठिकाणी असलेल्या झी बाजारला आज पहाटे २.३०च्या सुमारास भीषण आग लागली.
या आगीमध्ये कपडे, प्लास्टिकचे साहित्य, खेळण्याचे साहित्य आदी वस्तू पूर्णतः जळून खाक जाळ्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जवळपास १७ ते १८ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जेसीबीने इमारतीचे छत तोडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सकाळपर्यंत सुरूच होता. याच झी बाजारला लागून तिबेटीयन लोकांचे उनी कपड्यांचे दुकान लागले होते. मात्र ही आग वेळीच लक्षात आल्याने उनी कपड्यांचे गाठोडे बांधून ते रस्त्यावर जमा करून ठेवल्याने पुढील अनर्थ टळला .

चंद्रपूर शहर पोलिसांनी याबाबत दंगा नियंत्रण पथकासह घटनास्थळी दाखल झाल्याने लोकांची गर्दी आटोक्यात ठेवण्यात पोलिसांना यश आले . सदर झी बाजार हे मागील महिन्यात बंद होते आता पुन्हा नुकतेच सुरू झाले होते.

error: Content is protected !!
Exit mobile version