चांद्रयान-३ चंद्रापासून फक्त २५ किमी लांब, २३ ऑगस्टच्या संध्याकाळी चंद्रावर ‘लँडिंग’

पुणे, २० ऑगस्ट २०२३ : चांद्रयान मोहिमेबद्दल मिळालेल्या मोठ्या बातमीनुसार, चांद्रयान-३ चे दुसरे आणि अंतिम डिबूस्टिंग ऑपरेशन आज म्हणजेच रविवारी पहाटे १:५० वाजता पूर्ण झाले. या ऑपरेशननंतर, चंद्रापासून लँडरचे किमान अंतर २५ किमी आहे.

या यशाबद्दल इस्रोने ट्विट केले की, आता लँडरच्या अंतर्गत चाचण्या केल्या जातील आणि सूर्योदय होईपर्यंत ते लँडिंगच्या ठिकाणी थांबेल. येथूनच २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:४५ वाजता सॉफ्ट लँडिंगचा महत्त्वपूर्ण प्रयत्न केला जाणार आहे. त्या काळात लँडिंगमध्ये काही अडचण आल्यास महिनाभरानंतर पुन्हा प्रयत्न करावे लागतील कारण चांद्रयान-३ ला दुसऱ्या दिवशी सकाळची वाट पाहावी लागणार आहे, जी सकाळ २८ दिवसांनंतर येईल.

चांद्रयान-१ आणि चांद्रयान-२ मोहिमांचे प्रकल्प संचालक एम.अण्णादुराई यांच्या म्हणण्यानुसार, २३ ऑगस्टच्या संध्याकाळी चांद्रयान-३ च्या सॉफ्ट लँडिंगची शेवटची १५-२० मिनिटे सर्वात गंभीर असेल. कारण त्यानंतर लँडरला ३० किमी उंचीवरून चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचण्यासाठी सुमारे १५ ते २० मिनिटे लागतील. यानंतर, ६ चाकी रोव्हर विक्रम-लँडरमधून स्वयंचलित रॅम्पद्वारे बाहेर येईल आणि इस्रोकडून आदेश मिळताच चंद्राच्या पृष्ठभागावर फिरण्यास सुरुवात करेल.

या दरम्यान भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आणि इस्रोच्या ‘लोगो’ चा ठसा चंद्राच्या मातीवर, रोव्हर विक्रम-लँडरच्या चाकांमधून सोडला जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा