“चांद्रयान ३” मोहिमेला सरकारची मान्यता

नवी दिल्ली : “चांद्रयान-२” या महत्त्वाकांक्षी मोहिमेदरम्यान विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या लँडिंग करता न आल्याने इस्रोला आणि देशवासीयांना मोठा धक्का बसला होता. या अपयशातून इस्रोने आता पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. “चांद्रयान- ३ ” मोहिमेसाठी सरकारने देखील मान्यता दिली असल्याचे इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

पत्रकार परिषदेत सिवन म्हणाले की, चांद्रयान- ३ मोहिमेसाठी केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. या मोहिमेवर सध्या वेगाने काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. चांद्रयान-२ मोहिमेवर चांगली प्रगती केली होती. लँडर चंद्राच्या पृष्टभागावर आदळून तुटला असला तरी चांद्रयान-२ मोहिमेवेळी पाठवलेले ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे कार्यरत आहे.
तसेच पुढील सात वर्षांपर्यंत ऑर्बिटर कार्यरत राहणार असल्याचे के. सिवन यांनी सांगितले.या गगनयान मिशनचं डिझाईन पूर्ण तयार करण्यात आले असून या मोहिमेसाठी ४ आंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे, अशी माहितीही सिवन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा