Solar Agriculture Pump Scheme: राज्यातील शेतकाऱ्यांना फायद्याची ठरलेली सौर कृषी पंप योजना. आता योजनेच्या नियमावलीत बदल झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.पाण्याची पातळी खालावलेल्या भागांमध्ये १० एचपी क्षमतेचे कृषी पंप बसविण्यास मान्यता देण्यात आली आहे. असे त्यांनी विधानसभेत सांगितले.
काय म्हणाले मुख्यमंत्री :
विधानसभेत बोलत असताना त्यांनी घोषणा केली की, या वर्षीच्या वर्षीच्या सौर कृषी पंप योजनेअंतर्गत 10 लाख पंप बसविण्याचा आमचा विचार आहे. पण, काही भागांमध्ये पाणी पातळी खालवल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी ७.५ एचपी व १० एचपी पंप बसवण्यास परवानगी दिली जाईल. तथापि,७.५ एचपीपर्यंतच अनुदान मिळेल, त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या पंपांसाठी अनुदान दिले जाणार नाही,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
काय आहे ही योजना ?
या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या क्षेत्रानुसार ३.५ आणि ७.५ एचपी क्षमतेचे सौर कृषी पंप दिले जातात. त्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप किंमतीच्या १० टक्के, तर अनुसूचित जाती- जमातीच्या शेतकऱ्यांना ५ टक्के
रक्कम भरून सौर कृषी पंपाचा पूर्ण संच दिला जातो आणि उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकार कडून अनुदान म्हणून दिली जाते.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर