Pune Jail Police Bharti Recruitment: शिक्षणाचे माहेरघर म्हणून समजल्या जाणाऱ्या पुण्यात पुन्हा एकदा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पुण्यात महिला कारागृह पोलिस भरतीदरम्यान गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी लोखंडी गेटचा दरवाजा तोडून मुली आत घुसल्या. या गोंधळात चेंगराचेंगरी झाली असून यामध्ये अनेक मुली जखमी झाल्या आहेत. भरती प्रक्रिया व्यवस्थित नसल्याने हा गोंधळ उडाला आहे.
कारागृह पोलिस भरतीसाठी ५३१ जगांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. याच जागेसाठी आजपासून पुण्यात कारागृह पोलिस भरती सुरू झाली आहे. त्यासाठी हजारो तरुणी पुण्यात दाखल झाल्या आहेत. मात्र यासाठी तीन हजारपेक्षा जास्त मुलीनी गर्दी केली. यावेळी अकार्यक्षम व्यवस्थापणामुळे गोंधळ उडला.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर