गोल पोस्ट स्पॉटलाइट संगीत चार दिवसांनंतरही लतादीदी रूग्णालयात

चार दिवसांनंतरही लतादीदी रूग्णालयात

मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगशेकर यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असली तरी स्थिती चिंताजनक आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. चार दिवस उलटूनही लता मंगेशकर यांना रूग्णालयातच ठेवले आहे. रविवारी मध्यरात्री १.३० च्या त्यांना श्वसनाचा त्रास झाल्याने लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल केले आहे.

ब्रीच कँडी रूग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर फारूख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली औषधोपचार सुरू आहेत. सोमवारी लता दीदींना घरी आणण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर होती. मात्र ती अफवा असल्याचे समोर आले. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लता दीदींना श्वसनाचा त्रास झाल्यामुळे रूग्णालयात दाखल केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version