इंदापूर, ११ ऑगस्ट २०२०: इंदापुरमधील वरकुटे गावातील चार महिन्यांच्या बालकाची विहिरीमध्ये फेकून हत्या केल्या प्रकरणी अटकेत असणाऱ्या पित्याला अटकपूर्व जामीन मंजुर होऊ नये, अशी मागणी इंदापूर पोलिसांनी बारामती जिल्हा सत्र न्यायालयाकडे केली आहे. ही घटना ३१ जुलै रोजी वरकुटे (ता. इंदापूर) येथे घडली होती. याबाबतची फिर्याद त्या बालकाचा मामा दिपक मच्छिंद्र तांबवे(वय २०) रा.मोहोळ,जि.सोलापूर यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिली होती.
या प्रकरणी दिलेल्या फियार्दीत म्हटले आहे, लग्नानंतर पुजा हीला मुलगा झाला होता. त्याचे नाव ध्रुव असे ठेवले होते. सासरी नांदत असताना पुजाची धाकटी जाऊ पिवू बाबु शिंदे हीने पूर्वी घरात जावा जावात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पुजाच्या पतीला पुजा हीचे दुसऱ्या मुलाशी संबध असल्याने हे मुल तुझे नसल्याचे सांगुन पती – पत्नीमध्ये वाद निर्माण केला होता. पुजाचा पती पुजावर चारित्र्याचा संशय घेत होता. पती-पत्नीमध्ये वाद होऊन चार महिन्यांपूर्वी जन्मलेले बाळ हे माझे नसल्याने मी त्याला मारून टाकणार, काय व्हायचे ते होवु दे असे म्हणून पत्नी पुजा हीला धमकावत होता. तर पुजाची सासु कांताबाई दत्तु शिंदे हिने पुजाला बाळंतपणाला माहेरी सोडताना पुजाला झालेले बाळ हे त्याच्या बापासारखे दिसेल त्यावेळेस पुजाला सासरी नांदायला घेऊन जाईन अन्यथा माहेरीच ठेवणार असल्याचे सांगीतले होते. शुक्रवार दिनांक ३१ जुलै रोजी सकाळी दिपक मच्छींद्र शिंदे याने बालकाला विहिरीत फेकून हत्या केली. या प्रकरणात आरोपींनी संगनमत करून चार महिन्यांच्या बालकाची हत्या केली आहे.
या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना अटकपूर्व जामिन मंजुर करू नये, अशी मागणी इंदापूर ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक बी.एन लातुरे यांनी बारामती जिल्हा सत्र न्यायालयाकडे केली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव