पुरंदर २० ऑगस्ट २०२० :पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्यावतीने संपूर्ण पुणे जिल्ह्याची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणी मध्ये पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची देखील मोठ्या प्रमाणावर वर्णी लागलेली आहे. या कार्यकारणीची निवड पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांनी जाहीर केली.
यामध्ये पुरंदर मधून कोअर कमिटी सदस्य म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब जाधवराव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर भाऊ कामठे, विशेष निमंत्रित सदस्य म्हणुन रविंद्र फुले, कार्यकारिणी महिला सदस्य म्हणून अलकाताई शिंदे, वैशाली धसाडे, जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीसपदी श्रीकांत ताम्हाणे, महीला आघाडीच्या सरचिटणीसपदी ॠतुजा जाधव, माजी सैनिक आघाडीच्या सहसंयोजकपदी दशरथ घोरपडे, प्रकाश नाना भामे यांची नियुक्ती करण्यात आली.
हवेली मधून ओबीसी सेलच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी सागर भूमकर, पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी स्नेहलताई गणपत दगडे, राहुल रामचंद्र शेवाळे, संयोजक वैद्यकीय आघाडी बाळासाहेब एकनाथ हरपळे, जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी संदिप राजाराम हरपळे, यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे भारतीय जनता पार्टीचे पुरंदर तालुका अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी सांगितले.
निवडीनंतर कार्याध्यक्ष निलेश जगताप व सासवड शहराध्यक्ष साकेत जगताप, जेजुरी शहराध्यक्ष सचिन पेशवे श्रीकांत थिटे, प्रसाद अत्रे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी राहुल शिंदे