लोणी काळभोर १२ ऑक्टोबर २०२०: कोरोना महामारीमुळे पुढे ढकललेली हवेली तालुका पत्रकार संघाची निवडणूक आज पार पडली त्यात लोणी काळभोरचे जेष्ठ पत्रकार राजेंद्र काळभोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न हवेली तालुका पत्रकार संघाची आज द्विवार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली व ११ ऑक्टोबर २०२० ते १० ऑक्टोबर २०२२ या दोन वर्षाच्या मुदतीसाठी घेण्यात आलेल्या कार्यकारिणीच्या नऊ जागांसाठी प्रत्येकी एक असे नऊच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल वाळुंज यांनी जाहीर केले.
यासाठी प्रभाकर क्षिरसागर यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केले व नवीन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य पुढील प्रमाणे अध्यक्ष राजेंद्र काळभोर, उपाध्यक्ष जयदीप जाधव, सरचिटणीस अमोल अडागळे, कोषाध्यक्ष जितेंद्र आव्हाळे तर कार्यकारिणी सदस्यपदी अमोल भोसले, सचिन सुंबे गायत्री भंडारी, चंद्रकांत दुंडे, रियाझ शेख, यांची बिनविरोध निवड झाली आहे.
नवीन कार्यकारिणीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विभागीय सचिव बापूसाहेब गोरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे