गोल पोस्ट गुन्हा पैशासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

पैशासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

शिक्रापूर, दि. २७ जुलै २०२०: शिरूर तालुक्यातील करंजी मधील विवाहितेला माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावून शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. तसेच तिचा शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये तिच्या पतीसह पाच जणांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. करंदीतील प्रशांत नपते हे भोसरीमधील कंपनीत नोकरीला असल्याने ते करंदी व भोसरीत राहतात. पत्नी जयश्री हिला तिच्या घरातील सासू-सासरे व पती माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावत असे, तसेच लहान – मोठ्या कारणावरून तिला मारहाण करत असे. याबाबत जयश्री हिने तिच्या आई – वडिलांना देखील सांगितले. त्यांच्या माहेरच्या लोकांची व सासरच्या लोकांची बैठक देखील झाली होती.

त्यावेळी जयश्रीला आम्ही त्रास देणार नसल्याची खात्री तिच्या सासरच्यांनी दिली. परंतु, त्यानंतर देखील जयश्री हिला त्रास देणे सुरुच राहिले. तसेच जयश्रीची नणंद व तीचा पती हे देखील घरी आल्यानंतर जयश्रीला त्रास देत असत. तसेच तुझ्या वडिलांनी लग्नात वस्तू दिल्या नाहीत व तू माहेरून पैसे घेऊन ये असा तगादा जयश्रीला लावू लागला. त्यानंतर जयश्री आई वडिलांकडे आली. त्यानंतर आई वडील यांनी त्यांना संपर्क केला असता ते प्रतिसाद देत नव्हते.

याबाबत जयश्री प्रशांत नपते, रा. इंद्रायणी नगर भोसरी पुणे मूळ रा. करंदी ता. शिरूर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पती प्रशांत कैलास नपते, सासू शारदा कैलास नपते, सासरे कैलास शंकरराव नपते, सर्व राहणार इंद्रायणीनगर भोसरी तसेच नणंद पल्लवी जितेंद्र हरगुडे, तीचा पती जितेंद्र ज्ञानोबा हरगुडे, (दोघे रा. आंबेगाव खुर्द,जि पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्यासह पोलीस हवालदार आजिनाथ शिंदे, हे करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version