नवी दिल्ली, दि. २ जून २०२०: दिल्ली हिंसाचार प्रकरणात गुन्हे शाखेने करकरडूमा कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले आहे. दिल्ली पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात आम आदमी पक्षाचे माजी नेते आणि नगरसेवक ताहिर हुसेन यांचे मुख्य सूत्रधार म्हणून वर्णन केले आहे. आरोपपत्रात नगरसेवक ताहिर हुसेन यांच्यासह 15 जणांवर आरोप केले गेले आहेत.
सुमारे एक हजार पानांच्या या आरोपपत्रात कौन्सिलर ताहिर हुसेनचा भाऊ शाह आलम यांच्यावरही आरोप केले गेले आहेत. हिंसाचाराच्या वेळी आरोपी ताहिर हुसेन त्याच्या छतावर होता असे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे. ताहिर हुसेनवर हिंसाचार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताहिरने हिंसाचारासाठी १ कोटी ३० लाख रुपये खर्च केले होते.
दिल्ली पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, हिंसाचारापूर्वी आरोपी ताहिर हुसेन यानी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) च्या निषेधात सहभागी असलेल्या लोकांशी बोलणी केली होती ताहिर यानी जेएनयूचे माजी विद्यार्थी उमर खालिद यांच्याशीही बोलणी केली होती.
आरोपपत्रानुसार दिल्ली हिंसाचाराची संपूर्ण तयारी अगोदरच करण्यात आली होती. ताहिर हुसेन लोकांशी बोलले आणि त्याच वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दिल्लीत येतील तेव्हा दिल्लीत हिंसाचार केला जाईल हेही त्याच वेळी ठरवले गेले. मात्र पोलिसांनी या आरोपपत्रात उमर खालिदला आरोपी बनवले नाही.
ताहिर हुसेन कोण आहे
हाजी ताहिर हुसेन हे मुस्तफाबाद विधानसभेच्या नेहरू विहार प्रभागातील नगरसेवक आहेत. दिल्ली हिंसाचारात ताहिर हुसेनचे नाव आल्यानंतर आम आदमी पक्षाने त्याला पक्षातून काढून टाकले. त्याच्यावर दिल्लीत हिंसाचार पसरवल्याचा आरोप आहे, त्याच बरोबर इंटेलिजेंस ब्युरो कर्मचारी (आयबी) अंकित शर्मा यांच्या हत्येचा समावेश तसेच , त्याच्या घराच्या छतावरून हल्ला करण्यात आल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी










































