छत्रपती शाहू हायस्कूलमध्ये “स्मार्ट गर्ल्स” चे आयोजन

बारामती: येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीछत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बारामती येथे जिल्हा परिषद पुणे आणि भारतीय जैन संघटना यांच्या वतीने स्मार्ट गल्सॆ उजळणी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती शाहू हायस्कूल येथे स्मार्ट गर्ल्स उजळणी प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमाचे आयोजन तृप्ती कांबळे यांनी केले होते. या कार्यक्रमामध्ये बारामती तालुक्यातील विविध शिक्षण संस्थेतील ५० महिला शिक्षकांनी आपला सहभागी झाल्या होत्या. त्यांना मुलींमध्ये स्वसंरक्षण, आत्मनिरभरता , शारीरिक आणि मानसिक बदल, संवाद व नातेसंबंध या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षित शिक्षकांनी आपल्या शाळेतील इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींना १५ फेब्रुवारी पर्यंत मार्गदर्शन करायचे आहे. तसेच याविषयी कार्यक्रमाच्या ठिकाणी चर्चा देखील करण्यात आली. कार्यक्रमाला मास्टर ट्रेनर म्हणून रंजना काटे, नीता मोहिते, छायाअडसूळ यांनी शिक्षकांना प्रशिक्षण दिले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य वसंत माने , पर्यवेक्षक संजय ढवाण, शिक्षक प्रतिनिधी गणपत तावरे हे यावेळी उपस्थित होते.अलका चौधर यांनी आभार मानले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा