बीड : आज ग्रामीण भागात बऱ्याच गोष्टींची कमतरता पाहायला मिळते. बीड जिल्ह्यातील वाळकेवाडीतल्या चौथीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलाने शाळेत निबंधाचा विषय होता माझे वडील. त्याने लिहिलेला निबंध वाचल्याशिवाय डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. त्या विद्यार्थ्यांचे नाव मंगेश परमेश्वर वाळके असे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगेशच्या डोक्यावरील छत्र कमी वयातच काळाने लाड पुरवणारा बाप हिरावून घेतला. अशातच शाळेत निबंधाचा विषय आला माझे वडील. त्यानंतर १० वर्षाच्या निरागस पोरानं जो निबंध तो वाचून कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर हा निबंध सोशल माध्यामांवर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
मंगेश परमेश्वर वाळके असं या मुलाचं नाव आहे. बीड जिल्हयातील वाळकेवाडीतल्या शाळेत चौथीमध्ये शिकत आहे. गेल्या महिन्यात मंगेशच्या वडिलांचं निधन झालं. मंगेशचं कुटूंब अजुनही पुर्णपणे या धक्क्यातून सावरलं नाही. अशातच शाळेत वडिलांवर निबंध लिहायला लावल्यावर मंगेशनं वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.
माझ्या पप्पांचे नाव परमेश्वर वाळके असे होते.
माझ्या पप्पाला टिबीचा आजार झाला होता. म्हणून माझ्या मम्मीने मला मामाच्या गावी पाठवले होते. माझे पप्पा वारले. पप्पा घरात नसल्यावर कोणीच मदत करत नाही. रात्रीची आम्हाला चोरांची भिती वाटते. पप्पा तुम्ही लवकर या.., अशा शब्दात मंगेशनं त्याच्या संवेदना पानावर उमटवल्या आहेत.
दरम्यान, मंगेशची आई अपंग आहे. त्यामुळे वडिलांच्या जाण्याचा त्याला धक्काच बसला आहे. त्याने आपल्या निबंधातून वडिलांची कमतरता मांडली आहे.या आशयाचा निबंध सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.