अरूणाचलमध्ये ‘चिता’ हेलिकॉप्टर क्रॅश, पायलटचा मृत्यू

तवांग, ५ ऑक्टोंबर २०२२: अरुणाचल प्रदेशातील तवांगजवळ बुधवारी भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात ‘चित्ता’ हेलिकॉप्टरमधील एका पायलटचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा पायलट जखमी झाला असल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तवांगजवळील फॉरवर्ड एरियात उड्डाण करणारे ‘आर्मी एव्हिएशन चीता हेलिकॉप्टर’ आज सकाळी १० वाजता क्रॅश झाले. या अपघाताची सूचना मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमी झालेल्या दोन्ही वैमानिकांना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र हा अपघात नेमका कसा झाला हे अजून कळू शकलेले नाही.

दरम्यान, लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तर दुसर्‍या वैमानिकावर उपचार सुरू आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा