चेन्नई संघ पुन्हा एकदा पराजित, राजस्थान रॉयल्स संघाने केली ७ विकेट्स ने मात

दुबई २० ऑक्टोबर,२०२०: काल झालेल्या आयपीएल २०२० मधील ३७ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघावर ७ विकेट्स ने मात केली आहे. या पराजयांनतर चेन्नई संघाचे आयपीएल २०२० मधील प्ले ऑफ मध्ये जाण्याचे सर्वच मार्ग बंद झाले आहेत. तसेच या सामन्याचा शिल्पकार ठरला जोस बटलर. बटलर याने ४८ चेंडूत नाबाद ७० धावा केल्या.

सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.परंतु चेन्नई संघाला जास्त धावा करता आल्या नाही. चेन्नई संघाने २० षटक अखेर अवघ्या १२५ धावा केल्या. यात सैम करण याने २५ चेंडूत २२ धावा , फाफ डू प्लेसी याने ९ चेंडूत १० तर शेन वॉटसन याने अवघ्या ८ धावा केल्या. अम्बत्ती रायुडू याने १३ तर कर्णधार एम.एस.धोनी याने २८ धावा केल्या. चेन्नई संघाकडून रवींद्र जडेजा याने नाबाद ३० चेंडूत ३५ धावा करत चेन्नई संघाला १२५ धावापर्यंत पोहचवले.

१२६ धावांचा पाठलाग करताना बेन स्टोक्स याने ११ चेंडूत १९ धावा केल्या. तसेच रॉबिन उथप्पा आणि संजू सॅमसन हे स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर कर्णधार स्टीव स्मिथ आणि जोस बटलर या दोघांनी सामना सांभाळला. स्मितने नाबाद ३४ चेंडूत २६ धावा केल्या. तसेच जोस बटलर याने ४८ चेंडूत ७० धावा करत सामना राजस्थान रॉयल्स संघाला जिंकून दिला. चेन्नई संघाकडून गोलंदाजी करतांना, दीपक चहर याला २ विकेट्स तर हेझलवूड याला १ विकेट मिळाला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा