चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पाच विकेट्सने पराभव करत पटकावले पाचवे विजेतेपद

अहमदाबाद, ३० मे २०२३ : चुरशीच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल २०२३ चे विजेतेपद पटकावले. चेन्नईने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करत पाचव्यांदा चषकावर नाव कोरले. गुजरातने साई सुदर्शन (९६) आणि वृद्धीमान साहा (५४) यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर २१४ धावा केल्या होत्या. पण पावसामुळं डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईला सुधारित १५ षटकात विजयासाठी १७१ धावांचे आव्हान मिळाले. हे लक्ष्य चेन्नईने अखेरच्या चेंडूवर पूर्ण केले.

मात्र १२.१० वाजता सामना सुरू झाला आणि चेन्नईला १५ षटकांत १७१ धावांचे लक्ष्य मिळाले. सलामीवीर डेव्हॉन कॉनवे (४७) आणि ऋतुराज गायकवाड (२६) यांनी चेन्नईसाठी धावांचा पाऊस पाडला. दोघांनी ४ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता ५२ धावा केल्या. दोघांनी सातव्या षटकापर्यंत ७४ धावांची भागीदारी केली. येथेच डावखुरा फिरकी गोलंदाज नूर अहमद (२/१७) याने या षटकात दोघांनाही पॅव्हेलियन परतवले.

या सामन्यात गुजरातचे पारडे जड दिसत होते पण अजिंक्य रहाणेने झटपट २७ धावा (१३ चेंडू) करून संघाला माघारी धाडले. येथे मोहित शर्माने त्याच्या पहिल्याच षटकात त्याला बाद करून सामना रोमांचक केला. दुसरीकडे, शिवम दुबे (नाबाद ३१) यानेही आपले लक्ष केंद्रित केले आणि रशीद खानला सलग दोन षटकार ठोकले.

अंबाती रायुडूने (१९) शेवटचा सामना खेळताना १३व्या षटकात मोहितच्या पहिल्या तीन चेंडूंवर २ षटकार आणि १ चौकार लगावला. येथून सामना चेन्नईच्या बाजूने झुकला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर रायुडू बाद झाला. अशा स्थितीत स्वतः कर्णधार धोनी आला पण तो पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. शेवटच्या २ षटकात २१ धावांची गरज होती आणि १४ व्या षटकात मोहम्मद शमीने केवळ ८ धावा दिल्या. शेवटच्या षटकासाठी १३ धावा वाचवल्या.

मोहित शर्माने (३/३६) पहिल्या ४ चेंडूत उत्कृष्ट यॉर्करसह केवळ ३ धावा दिल्या. आता शेवटच्या दोन चेंडूंवर १० धावांची गरज होती. जडेजा (नाबाद १५) स्ट्राईकवर होता. मोहितने परत एक यॉर्कर टाकला आणि जडेजाने षटकार ठोकला. शेवटच्या चेंडूवर चार धावांची गरज होती आणि यावेळी मोहितने सर्वात मोठी चूक केली. त्याचा लेन्थ बॉल लेग स्टंपवर होता आणि जडेजाने तो चेंडू फाइन लेगच्या सीमारेषेवर मारला आणि हे लक्ष्य चेन्नईने अखेरच्या चेंडूवर पूर्ण केले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा