चेन्नई सुपर किंग्स संघाच्या संभावित प्लेइंग ११ आणि शेड्यूल

दुबई, १७ सप्टेंबर २०२०: इंडियन प्रीमियर लीग मधील सर्वात जास्त वेळा फायनल गाठणारा संघ म्हणजेच चेन्नई सुपर किंग्स. १० सीजन मधून ३ वेळा आयपीएल चे विजेतेपद मिळवणारा सी एस के संघ यंदा ही आयपीएल चे विजेतेपद मिळवण्यासाठी एक प्रबळ दावेदार मानला जात आहे. तसेच संपूर्ण क्रिकेट चाहत्यांचे लक्ष हे कर्णधार एम एस धोनी याच्यावर असणार आहे. मुख्य बाब म्हणजे धोनी गेल्या एक वर्षापासून मैदानाच्या बाहेर आहे. आणि प्रेक्षक त्याला खेळताना पाहण्यासाठी उत्साही आहेत.

आयपीएल सुरू होण्याच्या आधी प्रेक्षक त्यांच्या आवडत्या संघाबद्दल जाणून घेण्यासाठी उत्साही आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही चैन्नई चा संघ चांगलाच प्रदर्शन करेल अशी आस लावून प्रेक्षक आहेत. यंदा सी. एस.के. संघात सुरेश रैना आणि हरभजन सिंग हे वैयक्तिक कारणास्तव संघाबाहेर आहेत.

तसेच सी. एस.के. संघाच्या प्लेइंग ११ बद्दल बोलायचं झालं तर शेन वॉटसन , मुरली विजय, फैफ डू प्लेसी, अंबाती रायुडू, महेंद्र सिंग धोनी , केदार जाधव , डवेन ब्रावो, रवींद्र जडेजा , इम्रान ताहीर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर हे ११ खेळाडू सी.एस.के संघातून खेळताना दिसू शकतात.

एकूण खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर संघात महेंद्र सिंह धोनी (कप्तान), अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्रावो, फैफ डु प्लेसी, इमरान ताहिर, नारायण जगदीशन, कर्ण शर्मा, केदार जाधव, लुंगी एनगिडी, मिशेल सैंटनर, मोनू कुमार, मुरली विजय, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड़, शेन वॉटसन, शार्दुल ठाकुर, सैम करन, पीयूष चावला, जोश हेजलवुड, आर साइ किशोर यांचा समावेश आहे.

केव्हा असणार चेन्नई सुपर किंग्स संघाचे सामने ???

१९ सप्टेंबर, विरुद्ध मुंबई इंडियंस ७.३० वाजता, अबु धाबी

२२ सप्टेंबर,विरुद्ध राजस्थान रॉयल्स ७.३० वाजता, शारजाह

२५ सप्टेंबर, विरुद्ध दिल्ली कैपिटल्स ७.३० वाजता. दुबई

२ ऑक्टोबर, विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद ,७.३० वाजता, दुबई

४ ऑक्टोबर, विरुद्ध किंग्स इलेवन पंजाब ७.३० वाजता, दुबई

७ ऑक्टोबर,विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स ,७.३० वाजता, अबु धाबी

१० ऑक्टोबर,विरुद्ध रॉयल चैलेंजर्स बेंगलोर ,७.३० वाजता, दुबई

१३ ऑक्टोबर,विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद,७.३० वाजता, दुबई

१७ ऑक्टोबर, विरुद्ध दिल्ली कैपिटल्स ७.३० वाजता, शारजाह

१९ ऑक्टोबर,विरुद्ध राजस्थान रॉयल्स ७.३० वाजता, अबु धाबी

२३ ऑक्टोबर,विरुद्ध मुंबई इंडियंस ,७.३० वाजता, शारजाह

२५ ऑक्टोबर,विरुद्ध रॉयल चैलेंजर्स बेंगलोर ३.३० वाजता. दुबई

२९ ऑक्टोबर ,विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स ७.३० वाजता. दुबई

१ नोव्हेंबर,विरुद्ध किंग्स इलेवन पंजाब,३.३० वाजता, अबु धाबी

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा