CSK vs KKR Match Highlights: यंदाच्या १८ व्या हंगामात चेन्नईची गाडी काही पुढे जायच नावच घेत नाहीये. खराब फॉर्म,कर्णधारला झालेली दुखापत यामुळे कोलकता विरुद्धच्या सामन्यात संघाची जबाबदारी ४३ वर्षीय महेंद्रसिंग धोनीने आपल्या हाती घेतली.ज्यावेळी चेन्नईचे सूत्र धोनीने हाती घेतल्यावर चेन्नई सुपर किंग्सचे नशीब चकणार अशी सगळीकडे चर्चा रंगली होती. मात्र, प्रत्यक्षात उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या कोलकता नाइट राईडर्सने चेन्नईच्या घरच्या मैदानावर चेन्नईचा धूव्वा उडवला. विशेष म्हणजे १८ वर्षात चेपॉकवर चेन्नईच्या नावावर अनेक मोठमोठे विक्रम नोंदवले गेले पण शुक्रवारी घरच्या मैदानावर विक्रमांनी निचांकी गाठली.
चेकॉप स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात अजिंक्य राहणेच्या कोलकता नाइट राईडर्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अजिंक्य राहणे, मोईन अली, ड्रेवेन ब्राव्हो हे तिघही बराच काळ चेन्नई संघाकडून खेळले आहेत. त्यामुळे इथल्या खेळपट्टीचा अंदाज होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईला मोठ्या धावांचे लक्ष उभारता आले नाही. त्यांनी २० षटकांत केळव १०३ केल्या. ज्या १८ वर्षात चेन्नई सुपर किंग्सची घरच्या मैदानावरची सर्वात खराब कामगिरी आणि धावसंख्या राहिली.
घरच्या मैदानावर सलग तीन सामने गमवण्याची चेन्नईची ही पहिलीच वेळ आहे. याशिवाय १८ वर्षांच्या इतिहासात सलग ५ सामने गमवण्याची देखील ही पहिलीच वेळ आहे.सामना झाल्यावर महेंद्र सिंग धोनी म्हणला, आमचा खेळ अगदीच सर्वसाधारण झाला.सगळ्यांनीच आपल्या खेळीचे सखोल परीक्षण करायला हवं असा दिवस होता. खेळपट्टी आव्हानात्मक होती पण त्यावर खेळायच कस हे समजायला हव होत. आम्ही पुरेशा धावा करू शकलो नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर