Chennai Super Kings exit the playoffs this years IPL: पंजाब किंगसविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करून यंदाच्या आयपीएल मधून प्लेऑफ मधून बाहेर जाणार चेन्नई सुपर किंग्स हा पहिला संघ ठरला आहे.काल चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात पंजाबने चेन्नईचा ४ विकेट्सने पराभव केला. आता या विजयासह पंजाब किंग्सने १३ गुण मिळवून पॉइंट टेबलच्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
CSK ने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १९० धावा उभ्या केल्या होत्या. यूझीने १९ व्या षटकात हॅट्रिकसह चार विकेट्स घेतल्या.चेन्नईची १८ व्या षटकात १६४ वर ४ बाद अशी धावासंख्या होती.त्यांनी आपल्या पुढच्या ६ विकेट्स अवघ्या २६ धावांवर गमावल्या. सॅम करन आणि डेवोल्ड ब्रेविस यांनी ७८ धावांची भागीदारी करत चेन्नईचा डाव सांभाळला. करनने ४७ चेंडूत ८८ धावांची शानदारी खेळी केली. त्यामध्ये ९ चौकार व ४ षटकरांचा समावेश होता. चेन्नईचा संपूर्ण संघ १९.२ षटकांत १९० धावांवर डावबाद झाला.
याशिवाय १९० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्सची सुरुवात चांगली राहिली. त्यांच्याकडून प्रभासिमरन आणि कर्णधार श्रेयस अय्यरने दामदार खेळी केली. प्रभासिमरने ५४ तर श्रेयसने ७२ धावांची खेळी उभारली. ज्यामुळे पंजाब किंग्सला गुणतालिकेत झेप घेण्यासाठी सुर गवसता आला. श्रेयस अय्यरचे या पर्वातील चौथे अर्धशतक होते. मथिशा पथिराणाने पंजाबला धक्का देत सामन्यात चुरस आणली होती. यावेळी पंजाबला जिंकण्यासाठी २४ चेंडूत ४१ धावा हव्या होत्या. यानंतर पथिराणाच्या स्लोव्हर चेंडूवर अय्यरने दोन षटकार लगावत धोनीची आणि चेन्नईची चिंता वाढवली. पण पंजाबने ४ विकेट्स राखून ही मॅच जिंकली. याशिवाय चेन्नईचा १० सामन्यातील हा ८ वा पराभव ठरला.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर