पुणे: वाढदिवसाचा होणारा अनाठायी खर्च टाळून महापालिकेच्या शाळातील गोरगरीब विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज व शूर मावळा तानाजी चा इतिहास कळावा या उद्देशाने मोफत चित्रपटाचे आयोजन केले हे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे, समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना महाराजांचा इतिहास समजला पाहिजे या दृष्टीने सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केले.
साडेसतरानळीचे माजी उपसरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते रुपेश तुपे व मित्रपरिवार यांच्या पुढाकारातून हडपसर डीपी रस्त्यावरील स्वर्गीय विठ्ठलराव तुपे पाटील लर्निंग स्कूल मधील विद्यार्थ्यांना अमानोरा मॉल मधील आयनॉक्स थिएटर मध्ये तानाजी हा चित्रपट विनामूल्य दाखवण्यात आला, रक्तरंजित इतिहास पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर गर्व दिसत होता.
आमदार झाल्यानंतर प्रथमच चेतन तुपे यांचा वाढदिवस एक फेब्रुवारी रोजी होत असून त्यानिमित्त विविध स्तरातील लोकांची गर्दी असते लहान गोरगरीब विद्यार्थ्यांनाबरोबर आमदारांनी या व्यस्त कार्यक्रमातून काही वेळ काढून चित्रपट देखील पाहिला व गरीब विद्यार्थ्याच्या हस्ते केक कापला.
यावेळी माजी उपसरपंच रुपेश तुपे, डॉ. अमित तुपे, अनिकेत तुपे, अक्षय तुपे, शाळेचे मुख्याध्यापक विनायक पुणेकर तसेच या शाळेतील सर्व शिक्षक व महिला उपस्थित होत्या.
वाढदिवसानिमित्त रुपेश तुपे मित्र परिवाराच्या वतीने गोरगरीब विद्यार्थ्यांना स्वखर्चातून तानाजी चित्रपट दाखवून एक चांगला उपक्रम राबविल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे.