Chhagan Bhujbal Shapathvidhi : राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाचे जेष्ट नेते छगन भुजबळ यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. मुंबईतील राजभवनात त्यांचा शपथ विधी पार पडला. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रीपद दिल्याने छगन भुजबळ नाराज होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांना दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भुजबळ यांचा शपथविधी आज सकाळी १० वाजता पार पडला असून त्यांच्या शपथ विधिला मुख्यमंत्री देवेंद्र फाडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील मंत्री व प्रमुख नेते उपस्थित होते.
छगन भुजबळ राष्ट्रवादी कॉँग्रेसस पक्षाचे जेष्ट नेते असताना त्यांना महायुतीच्या मंत्री मंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. याशिवाय आपल्याला मंत्रीपद न मिळाल्याची खंत देखील त्यांनी अनेकवेळा व्यक्त केली होती. मात्र,आता भुजबळांची नाराजी दूर होण्याची शक्यता आहे. अजित पवारांनी मंत्री मंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी त्यांना संयम राखण्याचा सल्ला दिला होता.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेळी :
येत्या काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लागणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ओबीसी मतदार संघ आपल्या सोबत राहण्यासाठी महायुती सरकार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादने ही खेळी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. या आधी ओबीसीच नेतृत्व करण्यासाठी धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळात निवड करण्यात आली होती. पण, संतोष देशमुख प्रकरणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर










































