कर्जत २१ ऑगस्ट २०२० : तांबडी गावात अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करून निर्घुण हत्या केल्याच्या निषेधार्त छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीच्या वतीने कर्जत तहसील कार्यालयात निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
छत्रपतीं शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रात जिथे आपल्याला परस्त्रीचा आदर करण्याची शिकवण मिळते त्याच महाराष्ट्रात मानवतेला काळिमा फासणाऱ्या या हत्याकांडाचा तीव्र निषेध करत, सदरच्या हत्याकांडाचे आणि अत्याचाराचे स्वरूप अत्यंत भयानक असून महाराष्ट्राच्या गौरवतेला डाग लावण्याचे काम काही विकृत व्यक्तींकडून करण्यात आले आहे.त्यावर महाराष्ट्रामध्ये प्रचंड रोष प्रकट होत आहे.
छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती ही संघटना नेहमी अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत असते. संघटना महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पसरलेली आहे. त्यामुळे जिथे अशा घटना घडतात तेथे जाऊन त्या कुटुंबाला मानसिक आधार देणे, शक्य होईल तेवढी सर्वतोपरी मदत करण्याचे काम नेहमी सेवा समिती करीत आहे. सदर गुन्हेगारांना शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.तोपर्यंत समितीचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत, असे निवेदन कर्जत तहसील कार्यालयात नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे यांना देण्यात आले.
सदर प्रकरणात गांभीर्याने लक्ष द्यावे. परिसरातील सर्व गावकऱ्यांचा जनतेचा या अत्याचार प्रकरणी असलेला तीव्र रोष लक्षात घेऊन काही अनुचित प्रकार घडण्या अगोदर प्रकरणाचा तपास जलद गतीने करून सर्व दोषी आरोपींना कठोरात कठोर शासन होईल यादृष्टीने कुठल्याही राजकीय व सामाजिक दबावाला बळी न पडता प्रयत्न करावा. यामध्ये छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती आपणास सर्वतोपरी सहकार्य करेल असेही शेवटी या निवेदनात म्हटले आहे.या प्रसंगी तालुकाध्यक्ष अक्षय कासार, समितीचे शिलेदार प्रसाद मैड, मंथन पाटील, अवधुत ढोबे, चारुदत्त मैड आदि यावेळी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष