गोल पोस्ट गुन्हा “छत्रपती संभाजीनगर स्टेशनवर महिला प्रवाशाला लूट-धमकी, पोलिसांनाही ढकलाढकली!”

“छत्रपती संभाजीनगर स्टेशनवर महिला प्रवाशाला लूट-धमकी, पोलिसांनाही ढकलाढकली!”

“Loot & Threat at Chhatrapati Sambhajinagar Station – Passenger Targeted, Police Shoved!”

छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशन चौकात एका महिला प्रवाशाला शिवीगाळ, धमकी देऊन लूट केल्याप्रकरणी रिक्षाचालक युसुफ मोहम्मद अली अन्सारी याच्याविरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३६ वर्षीय महिला, या सरकारी कामगार कार्यालयातील अधिकारी असून त्या आरोपीच्या रिक्षाने प्रवास करत होत्या. रेल्वे स्टेशन चौक परिसरात रिक्षातून उतरताना भाड्याच्या कारणावरून आरोपीने महिलेचा हात धरून वाद घातला, अश्लील शिवीगाळ केली आणि धमकी दिली.

यावेळी वाहतूक पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने पोलिसांनाही धक्काबुक्की केली. महिला अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी युसुफ मोहम्मद अन्सारी याला अटक केली असून त्याच्यावर कलम 74, 352, 351(2), 119(1) BNS अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी गजानन राऊत

error: Content is protected !!
Exit mobile version