स्वराज्य संघटना २०२४ च्या निवडणुकीत उतरणार, छत्रपती संभाजीराजे यांची घोषणा

पुणे, १३ जुलै २०२३ : स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे हे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात दौरे करत संघटनेची बंधणी करत आहेत. यादरम्यान त्यांनी आपण राजकिय पक्षांना पर्याय देणारी संघटना लोकांना देऊ असे म्हटल होते. त्याप्रमाणे त्यांनी आता मैदानात उतरण्याची पुर्ण तयारी केली असून २०२४ च्या निवडणुकिवरून मोठी घोषणा केली आहे.

यावेळी संभाजी राजे यांनी २०२४ च्या निवडणुकित आपल्या स्वराज्य संघटनेचे उमेदवार हे दिसतील असे म्हणत रणशिंग फुंकले आहे. तर सध्याच्या सुरू अशलेल्या राजकिय गोंधळावर भाष्य करताना राजकारणात सध्य्या पोरखेळ पहायला मिळत असून कोण कोणत्या पक्षात आहे. राज्यात विरोधी पक्ष आहे की नाही अशी अवस्था झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर संघटनात्मक बांधणीसाठी पुन्हा एकदा सप्टेंबर महिन्यातपासून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार असल्याचेही छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे. त्यामुळे विदर्भात सत्ताधाऱ्यांसह प्रमुख विरोधकांना आता स्वराज्य संघटनेचे मोठे आव्हान असणार आहे.

छत्रपती संभाजी राजेंनी स्वराज्य संघटनेच्या स्थापनेची भूमिका ही लोकांना राजकारणामध्ये पर्याय देण्यासाठी संघटना उभी करणे अशी होती. स्वराज्य संघटनेच्या मागे तरुणांचा मोठा ओढा आहे. महाराष्ट्रातील तरुणांना राजकारणामध्ये जास्तीत जास्त संधी संघटनेच्या माध्यमातून दिली जाईल असे संभाजी राजे यांनी स्पष्ट केले होते. आता २०२४ च्या निवडणुकीमध्ये स्वराज्य संघटनेचे उमेदवार उतरणार असल्याने नेमके काय चित्र तयार होते हे पहावे लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा