गोल पोस्ट महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी

मनमाड ( जि.नाशिक) : शहरात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी नगरपरिषद अधिकारी यांना निवेदनही देण्यात आले.

गेल्या अनेक दिवसांपासून समस्त मनमाडकवासीयांची इच्छा आहे, की आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात यावा. गेल्या अनेक वर्षांपासून या महापुरुषांचा वापर मत घेण्यासाठी होत आहे. तरी आपण लोकभावनेचा आदर करून त्वरित दोन्ही महापुरुषांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्यात यावेत. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अशोक बिदरी

error: Content is protected !!
Exit mobile version