चिडचिडेपणा वाढलाय…मग ‘हे’ करा

आजकालच्या धावपळीच्या जगात तणाव आपल्या आयुष्याचा एक भाग होऊन बसला आहे. इच्छा नसतानाही आपण यामध्ये अडकतो आणि इच्छा असूनही यातून बाहेर पडू शकत नाहीत. यामुळे मौन वैतागून जातो आणि चिडचिडेपणा वाढतो.
कधी ऑफिसमधील टेन्शन तर कधी घरातील. सुपर मार्केटपासून ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्यानंतर आपण त्रस्त होऊ लागतो. तुम्हाला घाई असताना असे झाल्यास फ्रस्ट्रेशन आणखी वाढते, परंतु स्वत:चा मूड खराब करणारी परिस्थिती सुधारत नाही. काही टिप्स आत्मसात करून तुम्ही दररोज होणारा तणाव कमी करू शकता.
चिडचिडेपणा कमी करण्याच्या काही खास टिप्स…

७/११ ची गणना : जेव्हा कधी तणावग्रस्त परिस्थिती असेल, तेव्हा आकड्यांची गणना सुरू करा. श्वास आत घेतल्यानंतर एक ते सातपर्यंत आकडे म्हणा. श्वास सोडताना १ ते ११ पर्यंत आकडे म्हणा. काही वेळाने तुमच्या शरीराला आराम वाटू लागेल आणि मेंदूला त्रास देण्यार्‍या गोष्टीतून लक्ष दुसरीकडे वळेल.

मी टाइम : ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर वारंवार हॉर्न वाजवल्याने तुम्ही त्यातून लवकर बाहेर पडणार नाही. यापेक्षा हा वेळ स्वत:साठी वापरा. स्वत:वर लक्ष द्या, गाडी चालवताना आपली बसण्याची पद्धत ठीक आहे काय? आपल्या शहराची परिस्थिती कशी आहे? लोक कोणत्या विषयावर चर्चा करत आहेत, अशा गोष्टींवर विचार करा. हे काम तुम्ही बस, रिक्षामध्ये बसूनदेखील करू शकता.

नियोजन करा : जेव्हा तुम्ही मोठय़ा रांगेत स्वत:चा नंबर येण्याची वाट पाहत आहात. तर हा वेळ आराम करण्यासाठी वापरा. आपल्या पुढील काही गोष्टींचे नियोजन करा. आपले आवडते चॉकलेट किंवा पदार्थाचा आस्वाद घेऊ शकता. मोकळ्या वेळेत पदार्थाची खरी चव तुम्हाला कळेल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा