गोल पोस्ट आरोग्य आपत्कालीन कोविड सेंटर मध्ये रूपांतरित केलेल्या शहनाई बॅनक्वेट हॉलला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल...

आपत्कालीन कोविड सेंटर मध्ये रूपांतरित केलेल्या शहनाई बॅनक्वेट हॉलला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट

नवी दिल्ली,२४ जून २०२० : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी
शहनाई बॅनक्वेट हॉलला भेट दिली जे कोविड १९ च्या आपत्कालिन परिस्थितीत १०० बेडसहित रूपांतरित केले आहे.

एलएनजेपी हॉस्पिटल अ‍ॅनेक्सीजवळील कोविड -१९ केअर सेंटरच्या भेटीवेळी मुख्यमंत्र्यांसमवेत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया व अन्य अधिकारी उपस्थित होते एलएनजेपी रूग्णालयाशी संलग्न असलेल्या सुविधेचा आढावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला.

मंगळवारी दिल्लीत सर्वाधिक म्हणजे ३९४७ नवीन कोविड -१९ ची प्रकरणे नोंदविण्यात आली. दिल्ली आरोग्य विभागाच्या बुलेटिनच्या मते राष्ट्रीय राजधानीते एकूण,६६,६०२ प्रकरणांपैकी सक्रिय प्रकरणे २४,९८८ आहेत व किमान २३०१ लोक या रोगाला बळी पडले आहेत .

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version