मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला, काय आहेत भेटीमागची समीकरणं ?

33

१० फेब्रुवारी २०२५ मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोमवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. शिवाजी पार्क येथील एका नियोजित कार्यक्रमासाठी फडणवीसांना बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमाआधी त्यांनी त्यांचा ताफा थेट राज ठाकरे यांच्या घराकडे वळवला. या दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, त्यांच्या भेटीचं समीकरण काय आहे ? हे अद्याप सिद्ध झालेलं नाही. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला लवकरच सुरुवात होणार आहे. त्या दृष्टीने ही भेट महत्वाची मानली जात आहे.

नुकतीच दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालात भारतीय जनता पार्टीला यश आले. आता या यशानंतर भाजपच पुढचं लक्ष मुंबई महानगरपालिकेवर असणार आहे. देशाच्या राजधानीत भारतीय जनता पार्टीने तब्बल २७ वर्षानंतर आपली सत्ता स्थापन केली आहे.आता महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई महानगरपालिकेकडे भाजप आपली सत्ता स्थापन करण्याच्या तयारीला लागली आहे. याच समीकरणातून ही भेट झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभा निवडणुकीत खूप उशीराने चर्चा झाली असल्याने काही हाती लागल नव्हत. त्यामुळे मुंबई महपालिकेसाठी अगोदरच चर्चेला सुरुवात झाली असावी. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला पाहिजे तस यश मिळाल नाही. परंतु मुंबईमध्ये टाकरे गटाला चांगल यश मिळाल होत. ठाकरे गटाचे २० पैकी १० आमदार एकट्या मुंबईमधून निवडून आले होते. यावरूनच ठाकरे गट मुंबईमध्ये मजबूत असल्याचे दिसून येते.

मुंबई आणि ठाकरेंच वेगळंच नातं आहे. त्यामुळे राज ठाकरे जर महायुतीसोबत गेले, तर महायुती सरकारला नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे भाजप आतापासूनच तयारीला लागलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा