खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांची तुरुंगातून सुटका तर झाली पण नंतर त्यांचे शाब्दिक युद्ध सुरु झाले. लीलावती रुग्णालयातला नवनीत राणांचा एनआरआय चा व्हिडीओ माध्यमांसमोर आला आणि लीलावती रुग्णालयाच्या प्रशासनावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रश्न उपस्थित केले.
यावर आज नवनीत राणांनी थेट पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर आरोपांची पत्रिकाच दाखल केली. यावेळी नवनीत राणांनी माध्यमांना सांगितले की मुख्यमंत्री दोन वर्षे घरात बसून आहेत. त्यांचे ॲापरेशन, वैद्यकिय सेवा यांचे डिटेल रिपोर्ट मला दाखवणार का? एका महिलेला त्यांनी त्रास दिला आहे. एवढेच नव्हे तर मी ज्या घरात राहते , तिथे घरात कोणी नसताना बीएमसी येऊन नोटीस लावते. हा कुठला न्याय ? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. राज्यावरील संकट दूर व्हावे, यासाठीच आम्ही हनुमान चालीसाचे वाचन केले यात कुठला गुन्हा असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले आहे. शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला असून आम्ही वाढतच राहणार असा इशाराही त्यांनी दिला आहे.
यावर अजून शिवसेनेकडून कुठलेही उत्तर आले नसून १४ मे ला होणाऱ्या शिवसेनेच्या सभेत मुख्यमंत्री याचे उत्तर देणार का? आणि जर देणार तर ते काय आणि किती कान टोचणारे आहे, हे नक्कीच औत्सुक्याचे ठरणार आहे. तेव्हा प्रतिक्षा आहे १४ मे ची…
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस