मुंबई, २७ एप्रिल २०२१: केंद्र सारकारनं कोरोना संसर्गावरून देशवासियांना सावध केलं आहे. दुसरी लाट अंत्यत भंयकर आहे. त्यामुळं आता घरातही मास्क लावण्याची वेळ आलीय, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. या वरून देशातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं स्पष्ट होतंय. तसंच ऑक्सिजनचा देशात तुटवडा निर्माण झाला आसून सध्या ऑक्सिजनची गरज आहे.
यावरच उपाय म्हणून ज्या राज्यात ऑक्सिजन प्लांट आहेत तिथं ऑक्सिजन एक्सप्रेस नावानं रेल्वे सुरू केल्या आहेत. ज्यात टँकर ने ऑक्सिजन देशातील वेगवेगळ्या राज्यात पोहचवण्यात येत आहे. तिथं ही राजकारण होत असल्यानं ऑक्सिजन टँकर्समध्ये GPS लावण्यात आलेत. या टँकर्सची सरकार माॅनिटरींग करत आहे. शक्य तितक्या लवकर रूग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
राज्यात मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन……
एकिकडं केंद्र सरकार कोरोना लढ्यात थोडं कमी पडल्याची टीका होत आहे. तर राज्यांबरोबर करण्यात येणाऱ्या दुजभाव देखील समोर आला होता. तरी देखील महाराष्ट्रानं एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडलीय. ज्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं अभिनंदन केलंय.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्रानं २६ एप्रिल रोजी एक विक्रम केला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल ६ लाखांहून आधिक लोकांना लस देण्यात आली आहे. लवकरच आपण दिड कोटींचा टप्पा गाठू. या बद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं अभिनंदन केलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव