‘आप’कडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर; केजरीवालांची घोषणा

30

नवी दिल्ली, ४ नोव्हेंबर २०२२ गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलाय. गुजरातमध्ये आम आदमी पक्षानं इसुदान गढवी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार केलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज अहमदाबाद येथे पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. इशुदान गढवी हे सध्या आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस आहेत.

गुजरातमधील १६ लाख ४८ हजार लोकांनी आपला मत दिलंय. गुजरातमधील १६ लाखांहून अधिक लोकांच्या मताच्या आधारे त्यांनी निर्णय घेतलाय. येथील जनतेने इशुदान गढवी यांची निवड केलीय. त्यामुळं आमच्या पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा तेच असतील. गुजरात बदलाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे ते म्हणाले. ‘आप’ हे नवं इंजिन, नवी आशा आहे.

कोण आहेत इसुदान गढवी?

१० जानेवारी १९८२ रोजी गुजरातमधील पिपलिया येथे जन्मलेले इसुदान गढवी हे व्यवसायाने पत्रकार आहेत. इसुदान गढवी यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल सांगायचं झाल्यास, त्यांनी आम आदमी पार्टीचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत तौजून रोजी पक्षात प्रवेश केला. गुजरातमधील ‘आप’चे तळागाळातील नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा