गोल पोस्ट महाराष्ट्र बुधवारी मुख्यमंत्र्यांचा उस्मानाबाद दौरा

बुधवारी मुख्यमंत्र्यांचा उस्मानाबाद दौरा

उस्मानाबाद, १९ ऑक्टोबर २०२० पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवार दि २१ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार डॉ तानाजीराव सावंत यांनी दिली.

उद्धव ठाकरे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काटगाव व अपसिंगा येथे अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी सकाळी १०.१५ वाजता करतील आणि त्यानंतर तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पूरपरिस्थितीबाबत लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याशी चर्चा करतील व त्यानंतर दुपारी १.४५ वाजता सोलापूरकडे रवाना होतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंगळवारी २० ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्हा पाहणी दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा दिवसभर होती मात्र हा दौरा बुधवारी २१ ऑक्टोबर रोजी आहे.मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्ष विभागाने मुख्यमंत्री हे सोमवारी सोलापूर व बुधवारी उस्मानाबाद जिल्हा दौरा असल्याची माहिती दिली आहे.

न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड

error: Content is protected !!
Exit mobile version