“चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ” बद्दल माहिती आहे का?

नवी दिल्ली : लष्करप्रमुख पदावरुन नुकतेच निवृत्त झालेले जनरल बिपिन रावत हे आता नव्याने निर्माण करण्यात आलेल्या “चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ” या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. परंतु आपल्याला हे माहीत आहे का, की “चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ” म्हणजे काय? या पदाची निर्मिती का केली गेली. याबाबत माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. शिवाय बीपीन रावत हे या पदाचे कायमस्वरूपी सदस्य असणार आहेत.

“चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ” म्हणजे काय?

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदावर काम करताना जनरल रावत यांना तिन्ही सैन्य दल प्रमुखांइतकेच वेतन, भत्ते आणि सुविधा मिळणार आहेत. तसेच ते तिन्ही सैन्य दलांमध्ये योग्य समन्वय निर्माण करुन त्यांच्या क्षमतेचा पूर्णपणे वापर करुन घेण्याचे मुख्य आव्हान त्यांच्यासमोर असेल.

पाकिस्तानबरोबर लढल्या गेलेल्या कारगिल युद्धानंतर आढावा घेण्यासासाठी स्थापन करण्यात आलेल्या कारगिल आढावा समितीने सीडीएस पदाच्या निर्मितीचा सल्ला दिला होता. तब्बल २० वर्षांपूर्वी सरकारला हा सल्ला देण्यात आला होता. राजकीय नेतृत्वाला योग्य तो लष्करी सल्ला देण्यासाठी या पदाच्या निर्मितीची शिफारस करण्यात आली होती.

तिन्ही सैन्य दलांशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळया विषयांमध्ये सीडीएस संरक्षण मंत्र्यांचा मुख्य सल्लागाराचे काम करतील. तसेच तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख सुद्धा महत्वाच्या विषयांवर संरक्षण मंत्र्यांना सल्ला देऊ शकतात. संरक्षण साहित्य खरेदी, प्रशिक्षण आणि कर्मचारी वर्गाची निवड यामध्ये लष्करी विभागाची प्रमुख जबाबदारी असेल.

सीडीएस अधिकारी त्याच्या वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत सेवा बजावू शकतो. सीडीएस हे कॅग, मुख्य निवडणूक आयुक्त आणि सीव्हीसी आयुक्त दर्जाचे पद असेल. तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख हे तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर किंवा वयाच्या ६२ व्या वर्षी निवृत्त होतात.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा