चिकू खा…निरोगी रहा!

हिवाळ्यात आपण अनेक प्रकारची फळे खातो. पण आपल्याला माहीत आहे का की, हिवळ्यात आपण चिकू खाल्ला तर त्याचे फायदे काय..चला जाणून घेऊ या..

चिक्कू. लहान असोत वा मोठे सर्वांना चिक्कू खायला आवडतात. चिकू थंड, पित्तनाशक, पौष्टिक, गोड फळ आहे. चिकूच्या सेवनाने हृदयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण मिळते.

चिकूमध्ये जास्त प्रमाणत फायबर आढळते. गर्भावस्थेमध्ये लाभदायक कार्बोहायड्रेट आणि पोषक तत्त्वांची चांगली मात्रा प्राप्त करण्यासाठी चिकू लाभदायक आहे. प्रसूतीनंतर अंगावर जास्त प्रमाणात दूध येण्यासाठी हे फळ उपयुक्त आहे.

पित्तनाशक गुणधर्म असल्याने जेवणानंतर हे फळ खाल्ले जाते. तसेच हृदयासंबंधी आजारापासून संरक्षण करते. हाडांच्या मजबूतीसाठी सर्वात जास्त गरजेचे असतात ते कॅल्शिअम, फॉस्फोरस आणि आयर्नसारखे मिनरल्स. ते चिकूपासून मिळतात.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा